दहावीचे हॉलतिकीट ऑनलाईन!

दहावीचे हॉलतिकीट ऑनलाईन! ठाणे : मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त शाळांचे मार्च-२०२० माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या सर्व विद्यार्थांचे प्रवेशपत्रे मडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व मान्यताप्राप्त शाळांनी इ. १० वी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट विनाशुल्क व शाळेचा शिक्का, मुख्याध्यपकांच्या स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना द्यावे. तसेच प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ, बँक खात्याची माहिती इत्यादी दुरुस्त्या असल्यास दुरुस्तीकरून पुन्हा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्यात यावे, त्याचबरोबर पुढील कार्यवाही करिता शाळांनी अन्य एका प्रतवर दुरुस्ती दर्शवून शाळांनी मंडळात समक्ष प्रस्ताव विहीत शुल्कासह सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शहानिशा करून संबंधित शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (Duplicate) असा शेरा लिहून शाळेचा शिक्का, मुख्याध्यपकांच्या स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना द्यावे. तसेच प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी व फोटो चुकीचा असल्यास त्याच विद्यार्थाचा फोटो व स्वाक्षरी मुख्याध्यापकासमोर समक्ष स्वाक्षरी घेवून शाळेचा शिक्का, मुख्याध्यपकांच्या स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना देण्यात यावे. ___ ज्या विद्यार्थ्यांचे No Candidate चे प्रस्ताव मंडळाकडे सादर केले आहेत अथवा दिनांक ०५ फेब्रुवारी,२०२० पर्यंत मंडळाकडे प्रस्ताव सादर करतील, अशा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिले जाणार नाहीत. याची संबधित शाळांनी दक्षता घ्यावी.तसेच प्रवेशपत्र दुरुस्तीचे शुल्क सोबत जोडलेल्या विहित नमुना प्रतीसह पूर्ण भरून प्रवेशापत्राची प्रमाणित केलेली प्रत दि. १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत मंडळ कार्यालयात सादर करण्यात यावी असे आवाहन विभागीय सचिव, मुंबई विभागीय मंडळ, वाशी संदीप संगवे यांनी केले आहे.