मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या ७० हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. विविध विभागांतील ७० हजार रिक्तं पदे भरण्यात येणार आहेत. ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये या रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा झाली. ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्तर पदे आहेत. त्यामुळे तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ मध्ये विविध विभागात ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०१८ मध्ये ३६ हजार आणि २०१९ मध्ये ३६ हजार पदं भरली जाणार होती. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाईल असं त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती.
फडणवीसांची घोषणा ठाकरेंकडून अंमलबजावणी " ७० हजार रिक्त जागा भरणार